MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, ८ मे, २०२२

Number-वचन



  Number - वचन

 Singular Number -एकवचन 

ज्या नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होत असेल, असे नाम एकवचनी असते.Eg. boy, girl, book, pen, city, etc

Plural Number - अनेकवचन 

नामातून एकापेक्षा अधिक घटकांचा बोध होत असेल तर असे नाम अनेकवचनी असते. Eg. boys, girls, books, pens, cities etc.

खालील पद्धतींनी अनेकवचन केले जाते.


 Note:- अनेकवचन करताना Apostrophe देऊ नये.


काही एकवचनी नामांचे अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय लागतो.

Eg. boy - boys ,  desk - desks, book - books

 

ज्या एकवचनी नामाच्या शेवटी s, sh, ch, x किंवा z पैकी अक्षरे असतील अशा नामाचे अनेकवचन करताना es प्रत्यय लागतो

Eg. Dish- dishes  , box -  boxes  match - Matches 

 

ज्या नामाच्या शेवटी y आहे y पूर्वी एखादा स्वर आहे, तर अशा नामाचे अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय जोडला जातो.

Eg.- boy  - boys , essay -  essays , valley -Valleys

 

ज्या नामाच्या शेवटी y आहे परंतु y पूर्वी एखादे व्यंजन असेल तर अनेकवचन करताना y ऐवजी ies प्रत्यय जोडावा.

Eg. story -  stories ,  fly - flies

 

ज्या एकवचनी नामाच्या शेवटी 'o' असेल; परंतु त्या पूर्वी एखादे व्यंजन असेल अशा नामाचे अनेकवचन करताना 'es' प्रत्यय जोडावा

Eg. - mango - mangoes , potato - potatoes

 

अपवाद - वरील नियमाला अपवाद आहे. जी नामे इंग्रजीमध्ये परभाषेतून आली आहेत त्याचबरोबर संक्षिप्त रूप केलेल्या नामाच्या शेवटी 'o' असूनसुद्धा अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय लागतो

Eg. photo - photos ,  piano-  pianos, kilo - kilos 

 

ज्या नामाच्या शेवटी दोन 'स्वर' आहेत अशा नामांचे अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय जोडावा

Eg.  tree  - trees , cuckoo  - cuckoos , polio - polios 

 

जर नामाचा शेवट 'f' किंवा 'fe' ने होत असेल, तर ते काढून टाकून फक्त 'ves' प्रत्यय जोडावा

Eg.- leaves -  life,  wife - wives ,  wolf  - wolves 

 

 अपवाद - वरील नियमाला खालील नामे अपवाद आहेत

Eg.brief  - briefs  , roof -  roofs ,  chief - chiefs ,  grief - griefs

 

काही नामांच्या शेवटी अनेकवचन करताना 'en' किंवा 'ren' प्रत्यय लागतो.

Eg. Ox - Oxen  , child - children 

 

काही नामांतील स्वरात बदल करून अनेकवचन केले जाते

Eg. tooth - teeth ,  foot  - feet ,  man  - men 

 

काही नामांच्या शेवटी असणाऱ्या 'man' चे 'men' करून अनेकवचन केले जाते

Eg. work man - work men ,  gentle man -  gentle men 



दोन नामांपासून तयार झालेल्या संयुक्त नामातील शेवटच्या नामाला 's' प्रत्यय जोडून अनेकवचन केले जाते. कारण यातील पहिला शब्द विशेषणाचे कार्य करतो विशेषण एकवचनी असते

story - book story - books  ,  play-room - play-rooms

 

संयुक्त नाम जर in/of ने जोडल्यास पहिल्या मुख्य शब्दाचे अनेकवचन करावे.

son-in-law - sons-in-law 

man-of-War  - Men of War 

count-of-mail  - counts-of-mail

 

 13) अक्षरे, संख्या चिन्हांचे अनेकवचन करताना (s) वापरतात

Eg. T - Ts  ,10 -10s 

 

आद्याक्षरांचे अनेकवचन 's' प्रत्यय जोडून करतात.

Eg. MP - MPs    VIP - VIPs ,  UFO - UFOs

 

खालील संख्यादर्शक नामे; संख्यावाचक शब्दानंतर वापरल्यास अनेकवचनातसुद्धा त्यांचे रूप बदलत नाही; परंतु of पूर्वी वापरल्यास त्यांचे अनेकवचनात रूप बदलते.

Eg. Thousand, hundred, score, gross, dozen etc.

 I bought five dozen mangoes. 

 She spends thousands of rupees.

 

खालील नामांचे एकवचन अनेकवचनात रुप बदलत नाही.

 Eg. sheep, fish, deer, cannon, offspring, brace, cream, fruit, alphabet, moose, craft, swine, carp, grouse, trout, salmon etc.

Eg.I saw a sheep.

अपवाद - वरील नामांच्या संदर्भातील वेगवेगळ्या जातींचा उल्लेख केल्यास मात्र वरील नामे अनेकवचनी रूपात वापरली जातात. -

Eg. Apple, orange, sweet lemon are fruits.

 

इंग्रजी भाषेत परभाषेतून आलेल्या खालील शब्दांचे अनेकवचन अगदी वेगळ्याप्रकारे होते

crisis  - crises         ovum - ova          genius - genii            Axis - axes

index - indices       larva -  larvad            phenomenon  -   phenomena

 bacillus   -  bacilli    nucleus  -  nuclei         hypothesis  - hypothonen

 

 दोन भागापासून बनलेल्या वस्तूचे भाग नेहमी अनेकवचनी रूपातच असते. अशा वस्तूंचा उल्लेख एकवचनी किंवा विषम संख्येत करू नये, तो नेहमी जोपयोगी किंवा अनेकवचनीच करावा.

Eg. Pants, Pyjamas, Trousers, binoculars, spectacles

 

 खालील रोगांच्या नावाच्या शेवटी  ' s' असले तरी क्रियापद मात्र एकवचनीच वापरातात. Measles, mumps, rickets, shingles.

Eg 1) Measles has broken out in the city.

 

खालील विषयांची नागे शास्त्र या अर्थाने वापरल्यास ती एकवचनी असतात; परंतु याव्यतिरिक्त अर्थाने वापरल्यास ती अनेकवचनी अर्थान वापरली जातात.

Mathematics, Physics, Politics, Athletics, Ethics, Genetics, Economics, Linguistics, Mechanics, etc 

 

 News, Innings, Algiers, Athens, Brussels, Maples, Wales, The United Nations, The United States या नामांचे रूप अनेकवचनी असले तरी क्रियापद एकवचनी वापरले जाते

Eg. 1) This news is not true. 2) India won by an innings and three runs.

 

  Means अर्थ साधन असा घेतल्यास एकवचनी अनेकवचनी अशा दोन्ही अर्थांनी उपयोग केला जातो; परंतु Means चा अर्थ संपत्ती असा घेतल्यास तो नेहमीच अनेकवचनी असतो.

 i) Unfair mcans are not allowed here.

ii) Acroplanc is the fastest means of communication,

iii) Trucks and buses are means of travelling.

 

भाववाचक नामाचे अनेकवचन केले जात नाही .

Eg. 1) Honesty is the best policy.

 

सामान्य परिस्थितीत पदार्थवाचक नामाचे विशेषनामाचे अनेकवचन केले जात नाही क्रियापद एकवचनी असते.

 Eg. Water, oil, tin, wood, Mohan, Mumbai.

 

काही समूहवाचक नामे सामान्यपणे अनेकवचनी अर्थानेच वापरली जातात. त्यामुळे त्यांचे पुन्हा अनेकवचन करू नये; तसेच क्रियापद अनेकवचनी वापरावे तर काही समूहवाचक नामे एकवचनी अर्थाने वापरतात म्हणून क्रियापद एकवचनी वापरावे.

Eg. 1) Cattle are grazing.

 

 Droughts , Billiards ,Gymnastics , Darts , Bowls,  Dominoes वरील Games name एकवचनी अभिन वापरली जातात म्हणून क्रियापदही एकवचनीच असते

Eg. 1) Billiards in a popular game.

 

Furniture , Machinery , Equipment , Drapery , Imagery , poetry , scenery , stationery , traffic , luggage , crockery , electricity , work , Dust , Rubbish , wood , Iron , print या शब्दांचे अनेकवचन करू नये तसेच क्रियापद एकवचनी वापरावे.

Eg. I)This luggage is very heavy. 2) Shakespeare's poetry is very popular in the world

 

शब्दयोगी अव्ययाच्या मागेपुढे तोच शब्द अल्यास त्याचे अनेकवचन करू नये

Eg. Day by day, woman after woman, row upon row


 Man, Lord हे शब्द संयुक्त नामाच्या सुरूवातीला असतील तर दोन्ही शब्दांचे अनेकवचन करावे.

Eg. Man-servant - Men-servants  , Lord-justice - Lords-justices 


 30) Mens, Childrens था अनेकवचनांना Double Plurals असे म्हणतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा