• अजंठा गुंफा (Ajanta Caves) :
दगडात कोरलेल्या बुद्ध लेण्या .
या लेण्या इ.पू. २०० ते इ.स. ६५० या कालखंडातील आहेत. येथील चित्रकला व कोरीव काम प्रसिद्ध आहे.
बुद्ध जीवनातील तसेच धर्माशी संबंधित चित्रकला याची नोंद युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीत झाली (१९८३) आहे.
• वेरूळ गुफा : (Ellora caves) :
*वेरूळ हे भारतीय अश्म कोरीव कामाचा सारांश दर्शवते.
* हे येथील घृष्णेश्वर मंदिर स्थापत्य व वेरूळच्या गुफा ज्या कातळ खडकात कोरल्या गेल्या यावरून लक्षात येते.
* युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीत नोंद -१९८३.
ब) धार्मिक स्थळे :
भिमाशंकर मंदिर
त्र्यंबकेश्वर मंदिर
घृष्णेश्वर मंदिर
पंढरपूर विठ्ठल मंदिर
शनिशिंगणापूर मंदिर.
महाकाली मंदिर
क) उत्सव :
नाशिक कुंभमेळा
प्रत्येक १२ वर्षांनी भरणारा हिंदू धर्मातील संतांना एकत्र आणणारा हा भव्य सोहळा आहे.
पवित्र तिथीला शाही स्नान केले जाते.
• पालखी उत्सव :
वारकरी संप्रदायाचे लोक मागील एक हजार वर्षापासून ही परंपरा पाळत आले आहेत.
यामध्ये २२ दिवसाच्या उत्सवात शेवटी पालखी पंढरपूरला पोहोचते.
ड) कला व स्थापत्य :
• पैठणी साडी (Paithani saree, GI. as handicraft)
पैठण (औरंगाबाद) येथे बनणाऱ्या या साडीचा काठ तिरप्या व चौकोनी डिझाईनचा आणि पदर मोरपंखी असतो.
यामध्ये साधे व ठिपक्याचे डिझाईन मिळते. यामधील कालीडोस्कोपीक इफेक्ट (Kaleidoscopic effect) म्हणजे आयताकृती साडीची लांबी ही वेगळ्या रंगाच्या धाग्यांनी विणणे व रूंदीचे विणकाम दुसऱ्या रंगाच्या धाग्यांनी करणे होय.
हा प्रकार सध्या लोकप्रिय होत आहे.
* पुणेरी पगडी (G.I. as handicraft) :
हा डोक्यावर घालायचा फेटा आहे.दोनशे वर्षापूर्वी महादेव गोविंद रानडे यांनी याला प्रसिद्धी दिली.
* सोलापूरी चादर (GI. as handicraft) :
सोलापूरच्या सूती गिरणीमध्ये तयार होणाऱ्या या चादरी पूर्ण भारतभर व आंतरराष्ट्रीय बाजारातही प्रसिद्ध आहेत.
• हिमरू आणि मशरू :
हिमरू वस्त्र हे सूती व रेशमी धाग्याचे असते.
याच्या मूळ रूपात चांदी व सोन्याच्या तारा घालून आकर्षक सोनेरी रूप दिले जाते .
ई) चित्रकला
वारली चित्रकला :
ही चित्रकला वारली जमातीच्या लोकांनी भिंतीवर काढली आहे.
शेणमाती ने सारवलेल्या भिंतीवर दैनंदिन जीवनातील दृश्य, प्राणी, नृत्यदृश्य, लावणी (भात) दृश्य, फक्त पांढऱ्या रंगांनी ही चित्रे .
तुरळक लाल, पिवळा ठिपका दिसतो.
हा रंग भाताच्या पिठात चुनखडी मिसळून तयार केला.
*अजंठा चित्रकला :
अजंठा गुफेतील भिंती या भव्य दिव्य, शाही प्रांगण, प्रेमाचा रोमांस, गायन व नृत्य तर काही प्राकृतिक हिरवळ व फुले, पशू पक्षी यांच्या चित्रांनी भरलेल्या आहेत.
चित्रकला या बुद्ध जीवनाशी व जातक कथेशी संबंधित .
सादरीकरण कला:
तमाशा:
ईराणी भाषेतील या शब्दाचा अर्थ मजा-मेजवानी असा होतो. यामध्ये गायन-नृत्य तुकडी व लोकनाट्य तुकडी असतात.
कोल्हाटी व महार जाती या तमाशाशी संबंधित आहेत.
यामधील गायक शाहीर असतो जो अनेक प्रेमगीतांची जुळणी करतो.
येथील मुख्य पात्र महिला नर्तकी असते.
• नृत्य :
यामध्ये पोवाडा, दिंडीकला, लावणी, कोळीनृत्य यांचा सामावेश होतो.
* लावणी :
लावणी हा शब्द लावण्यता, सौंदर्य यापासून तयार झाला.
लावणी नृत्यात संगीत व नृत्याचे मिश्रण असते. वाद्ययंत्र मुख्यतो ढोल असतो.
ढोलकीच्या तालावर साडी परिधान केलेली स्त्री मोहक चालीमध्ये नृत्य करते.
* कोळी नृत्य :
कोळी जमातीचे स्त्री-पूरूष नाव चालवल्यासारख्या हालचाली मध्ये दोन गट बनवून हे नृत्य सादर करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा