द्रोपदी मुर्मु-भारताच्या भावी राष्ट्रपती!!
जाणून घेऊयात भारताच्या भावी राष्ट्रपतीपदाच्या दावेदार याबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती-
•64 वर्षीय द्रोपदी मुर्मु यांचा जन्म 20 जून 1958 रोजी मयूरगंज,ओडिशा या राज्यांमध्ये झाला.
•लहानपणी त्यांचे शिक्षण रमादेवी महाविद्यालय भुवनेश्वर या ठिकाणी झाले, द्रोपदी मुर्मु या कला शाखेमध्ये पदवीधर आहेत.
•त्यांचे आजोबा व त्यांच्या वडिलांकडून मिळालेला सामाजिक सेवा व राजनीतिक वारसा त्यांनी समोर चालवला.
•त्यांचे लग्न श्याम चरण मुर्मु यांच्याशी झाले.
•सुरुवातीच्या आयुष्यात शिक्षकी पेशा असलेल्या द्रोपदी मुर्मु यांनी आपले समोरचे आयुष्य मित्र समाज कारणांमध्ये व राजकारणामध्ये समर्पित केले केले आणि त्या राजकारणामध्ये सक्रिय रित्या सहभागी झाल्या.
ओडिसा राज्याचा राजकारणामध्ये असलेला सक्रिय सहभाग-
•त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात पदार्पण केले. त्या भारतीय जनता पार्टी तर्फे दोन वेळा आमदार म्हणून ओडीसा राज्यातून निवडून आल्यात.
•1997 साली द्रोपदी मुर्मु यांची नारायणपूर नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे.
•ओडिशा राज्यात,बीजेपी आणि बीजेडी यांच्या संयुक्त सरकारांमध्ये,त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक हे खाते मार्च 2000 ते ऑगस्ट 2002 पर्यंत तसेच मत्स्यव्यवसाय आणि प्राणी संसाधन विकास हे खाते ऑगस्ट 2002 ते मे 2004 पर्यंत सांभाळले.
•त्यांना 2007 साली निळकंठ पुरस्कार -सर्वोत्कृष्ट आमदार ओडिसा विधानसभा 2007 हा मिळाला.त्यांच्या कार्यशैली कडे बघून तसेच त्यांचे समाजकारण व राजकारणामध्ये असलेले समर्पण बघता.
राज्यपाल म्हणून नेमणूक-
•2015 साली त्या झारखंड या राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या.
•तसेच त्याच सोबत त्या पहिल्या अनुसूचित जमाती मधल्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत ज्यांची भारतामध्ये राज्यपाल म्हणून नेमणूक झाली.
• त्याची झारखंड राज्याच्या 9 व्या राज्यपालपदी म्हणून नेमणूक झाली.
•त्यांचा कार्यकाळ हा 18 मे 2015 पासून 12-7-2019 पर्यंतचा होता.
•द्रोपदी मुर्मु यांच्यानंतर झारखंड राज्यपालपद हे श्री.रमेश बैस हे सांभाळतील.
•भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी द्रोपदी मुर्मु प्रमुख दावेदार -
• 21 जून 2022 ला भारतीय जनता पार्टीने द्रोपदी मुर्मु यांचे नाव भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी घोषित केले आहे.
•भारताच्या राष्ट्रपतिपदाच्या प्रमुख लढतीत द्रोपदी मुर्मु विरुद्ध विपक्षी दलाकडून यशवंत सिन्हा यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
•द्रोपदी मुर्मु राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर त्या भारताच्या प्रथम आदिवासी राष्ट्रपती सोबतच भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून अनुसूचित जमाती म्हणून ओळखल्या जातील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा