MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शुक्रवार, १५ जुलै, २०२२

भारत


भारताचा भूगोल

भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश, 38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.

भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो.

भारतीय भु-सीमा पुढील  देशांना भिडते. 

1.पाकिस्तान, 2.नेपाळ, 3.भूतान, 4.चीन, 5.म्यानमार, 6.बांगलादेश

भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे.

भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.

भारताची पूर्व-पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर-दक्षिण लांबी 3214 आहे.

भारताची भु-सीमा 15,200 किमी एवढी आहे.

जगाच्या एकूण भूभागांपैकी 24% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.

21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.

जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.

के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.

कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळ च्या सीमेवार आहे.

भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.

देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.

भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.

देशातील गोड्या पाण्यातील सर्वांत लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे.

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील

1.राजस्थान, 

2.मध्यप्रदेश,

3.महाराष्ट्र

4.आंध्रप्रदेश.

5.उत्तरप्रदेश.

6.जम्मू काश्मीर.

7.गुजरात.

8.कर्नाटक.

9.ओरिसा.

10.तामिळनाडू.

भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.

पृथ्वी भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो

भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली

भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे मुख केंद्र आहे. 

देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.

देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.

देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.

सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग NH-2,NH-6,NH-7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.

भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे-

भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी-शिरपूर, महाराष्ट्र

भारतातील पहिले इ टेम्पल -शिर्डी (अहमदनगर, महाराष्ट्र) 

भारतातील पहिले खाजगी विमानतळ-कोची (केरळ)

भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा - कोट्टायम (केरळ)

भारतातील पहिले पोलीस संग्रहालय-गाझियाबाद(उत्तरप्रदेश) 

भारतातील पहिले बायोटेक शहर-लखनौ(उत्तरप्रदेश)

भारतातील पहिले इ कोर्ट -बिहार.

भारतातील पहिले इ पोस्ट--पाटणा  (बिहार)

भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र---कोलकाता (प. बंगाल)

भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.

भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.

  • General Knowledge India

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा