MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ


  बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ

  • कर्झनच्या अंतर्गत धोरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बंगालची फाळणी.
  •  प्रशासनाच्या सोयीसाठी बंगाल व आसाममधील सीमा पुर्नधारण.
  •  बंगाल / बिहार/ओरिसा.
  • लोकसंख्या : 8 कोटी.
  • कर्झनने फाळणीला प्रशासकीय सीमांचे पुर्ननिर्धारण असे म्हटले. 
  • 1904 मध्ये कर्झनने बंगालचा दौरा.
  • 7 जुलै 1905 सीमला घोषणा.
  • 20 जुलै 1905- बंगाल प्रांताचे दोन भागात विभाजन आदेश.

 16 ऑक्टोबर 1905 फाळणी अंमलात.


  •   पूर्व बंगाल व आसाम प्रांत 

 निधी : 3 कोटी रु. 1.80 लाख मुस्लिम ,1.20 हिंदू व इतर

  • उर्वरित बंगाल प्रांत

5 कोटी रु. - हिंदू, बंगाली, बिहारी, ओरिया इ.

पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा.

  • कर्झनने प्रशासकीय सोय हा उद्देश.
  • मात्र खरा उद्देश राष्ट्रवादी, बंगाली जनतेमध्ये धर्माच्या व भाषेच्या आधारावर फुट पाडणे हा होता.

 कर्झन 

  •  फाळणीचा उद्देश मुस्लिम प्रांत बनविणे हा आहे. जेथे इस्लाम हा मुख्य धर्म असेल आणि त्यांच्या अनुयायांचे जास्त वर्चस्व असेल.
  • हिंदू-मुस्लिम ऐक्य नष्ट करणे, बंगाली समाजाचे तुकडे करणे हा उद्देश

 मुस्लिम खुष  

  •  कारण राजकीय व आर्थिक लाभ, मुस्लिम बहुल प्रांत 
  • राजशाही, चितगाव ढाका हेड क्वार्टर - ले. गव्हर्नर 
  •  मोर्ले : फाळणी एक दृढ सत्य आहे.
  • काँग्रेस, बंगाली राष्ट्रवादी नेते, व्यापारी, वकील, गरीब व्यक्ती महिला इत्यादींचा विरोध. 
  •  कर्झनच्या मते फाळणीचा विरोध हा अंशत: अनैतिक आणि अंशत: चुकीच्या माहितीमुळे होता.
  •  राष्ट्रवाद कमकुवत करण्याचा प्रयत्न.
  • बंगाली भाषिक प्रदेशापासून हिंदी भाषिक प्रदेश व ओरिया भाषिक प्रदेश वेगळा .
  • 1865-वायव्य प्रांत निर्माण.
  • 1874-आसाम वेगळा.

 स्वदेशी चळवळ / वंगभंग चळवळ

  1.  फाळणीला विरोध म्हणून.
  2. स्वेदेशीला पाठिंबा.
  3.  सुरुवातीचे नेतृत्व : सुरेंद्रनाथ बॅनर्जी व कृष्णकुमार मित्रा बहिष्कार अस्त्र वृत्तपत्र - संजीवनी
  4. या चळवळीत जहाल + मवाळ या नेत्यांनी एकमेकांशी सहकार्य केले.
  5. ही चळवळ बंगालमध्ये राष्ट्रीयत्वाची चळवळ होती. 

  7 ऑगस्ट 1905 

  कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये सभा ब्रिटिश मालावर बहिष्कार ठराव.

 16 ऑक्टोबर 1905 

1) संपूर्ण बंगालमध्ये राष्ट्रीय शोक दिन.

2) उपवासाचा दिवस.

3) कलकत्ता हरताल.

4 ) गंगानदी स्नान रक्षाबंधन कार्यक्रम.

5) रविंद्रनाथ टागोर आमार सोनार बांगला गीत -1971 बांगला देश राष्ट्रगीत.

6 ) वंदेमातरम - बंगालचे राष्ट्रगीत.

7 ) आनंद मोहन बोस - फेडरेशन हॉलची पायाभरणी -बंगालच्या अतुट एकतेचे दर्शन 

 स्वदेशी व बहिष्कार

  •  जनसभा घेऊन स्वदेशी वस्तूंचा वापर आणि ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार
  • विदेशी कपड्यांच्या होळ्या
  •  विदेशी कपड्यांच्या दुकानांसमोर निदर्शने (यामुळे सामाजिक जीवनात बदल) 
  • वाद : राष्ट्रीय अस्मिता वाद, आत्मविश्वास प्रतिष्ठा वाद
  • आचार्य पी. सी. रे ( प्रफुल्लचंद्र रे) बंगाल केमिकल स्वदेशी स्टोअर्सची स्थापना.
  • राष्ट्रवादी गद्य, काव्य उदय
  •  राष्ट्रीय शाळा स्थापन.
  • 1906 नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना .
  • कलकत्ता नॅशनल कॉलेज प्राचार्य अरविंद घोष.
  • विद्यार्थी, महिला, मुस्लिम इत्यादींचा सहभाग.
  •  विद्यार्थ्यांनी स्वदेशीचा वापर, प्रसार, स्वदेशी कापड विकणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने – संघटन नेतृत्व.
  • ज्या शाळांनी चळवळीत भाग घेतला त्या शाळांचे अनुदान संलग्नता विशेषाधिकार वि. चि. स्कॉलरशिप काढून घेतली.
  • विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, काहींना दंड व अटक.
  • महिलांचाही चळवळीत भाग, मोर्चे व निदर्शने यात सहभाग.
  •  मुस्लिम सहभाग मौलाना अब्दुल कलाम आझाद, अब्दुल रसुल इ.
  •  चळवळ ही बंगालमधून संपूर्ण भारतात पसरली.
  • स्वराज्याच्या मागणीला जोर.
  • नेतृत्व जहाल गटाकडे.
  •  बहिष्कार तत्व पसरविण्यात लोकमान्य टिळक आघाडीवर मोर्ले :
  • फाळणी वस्तुस्थिती आहे त्यामुळे बदल नाही.

सरकारच्या दडपशाहीच्या धोरणांविरोधात लोक जहालवादी व क्रांतिकारी धोरणांकडे वळाले.

 दडपशाही

1) रस्त्यावर वंदेमातरम म्हणण्यास बंदी .

2) सर्व सभांवर बंदी दडपशाही

3) वर्तमानपत्रांवर बंदी .

4) स्वदेशी कामगारांवर खटले.

5) राष्ट्रवादी वर्तमानपत्रांवर खटले - प्रेसचे स्वातंत्र्य.

 6) शहरांमध्ये लष्करी पोलीस .

7) 1908 कृष्णकुमार मित्र व अश्विनकुमार दत्त बंगालमधून हद्दपार. 

8) टिळकांना 6 वर्षे अटक दडपून टाकले.

9) अरविंद घोष - राजकीय स्वातंत्र्य हे राष्ट्राचे जीवनश्वास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा