MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे


 कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे

 कृष्णशास्त्री चिपळूणकर- मराठीचे जॉन्सन

 ग.चिं. केळकर-साहित्यसम्राट 

 ना. वा. केळकर-मुलाफुलांचे कवी 

 सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व

 कृष्णाजी केशव दामले -केशवसुत

 आत्माराम रावजी देशपांडे - अनिल 

 दिनकर गंगाधर केळकर -अज्ञातवासी

  माधव त्र्यंबक पटवर्धन -माधव ज्युलियन

 शंकर काशिनाथ गर्गे -दिवाकर

  गोपाळ हरी देशमुख -लोकहितवादी    

  नारायण मुरलीधर गुप्ते - बी 

 वसंत ना. मंगळवेढेकर -राजा मंगळवेढेकर

 माणिक शंकर गोडघाटे -ग्रेस 

 नारायण वामन टिळक -रेव्हरंड टिळक

  केशवसुत-आधुनिक मराठी काव्याचे/ कवितेचे जनक

 सेतू माधवराव पगडी -कृष्णकुमार 

 दासोपंत दिगंबर देशपांडे -दासोपंत 

  हरिहर गुरुनाथ कुलकर्णी -कुंजविहारी 

  रघुनाथ चंदावरकर - रघुनाथ पंडित 

 चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू  

 दत्तात्रय कोंडो घाटे -दत्त 

 नारायण सूर्याजीपंत ठोसर -रामदास

 मोरोपंत रामचंद्र पराडकर - यशवंत मोरोपंत 

 यशवंत दिनकर पेंढारकर- महाराष्ट्र कवी 

  बा. सी. मर्ढेकर- मराठी नवकाव्याचे/ कवितेचे जनक,निसर्गप्र 

  सावित्रीबाई फुले- आधुनिक मराठी कवितेच्या जननी

 संत सोयराबाई- पहिली दलित संत कवयित्री

 त्र्यंबक बापूजी ठोंबरे- बालकवी

 ना. धों. महानोर- रानकवी

 विनायक जनार्दन करंदीकर- विनायक 

 काशिनाथ हरी मोडक- माधवानुज

 प्रल्हाद केशव अत्रे- केशवकुमार

  त्र्यंबक बापूजी ठोंबरे- बालकवी

  वि. वा. शिरवाडकर- कुसुमाग्रज

  शाहीर राम जोशी- शाहिरांचा शाहीर

  ग. त्र्यं. माडखोलकर- राजकीय कादंबरीकार

 राम गणेश गडकरी- बाळकराम,गोविंदाग्रज

  दादोबा पांडुरंग तर्खडकर- मराठी भाषेचे पाणिनी

 विष्णुशास्त्री चिपळूणकर- मराठी भाषेचे शिवाजी

काव्यग्रंथ व कवी -

  यथार्थदीपिका -वामन पंडित

 महाभारत-व्यासमुनी

  बिजली- वसंत बापट

  गीता -व्यासमुनी

  दासबोध व मनाचे श्लोक - समर्थ रामदास

 मुद्राराक्षस- विशाखादत्त

 शीळ- ना. घ. देशपांडे

 मृच्छकटिक -शूद्रक

 गीतरामायण-ग. दि. माडगूळकर

 केकावली - मोरोपंत

 ज्वाला आणि फुले - बाबा आमटे 

 नलदमयंती स्वयंवराख्यान - रघुनाथ पंडित

 स्वेदगंगा-वि. दा. करंदीकर

 अभंगगाथा -संत तुकाराम

 भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) - संत ज्ञानेश्वर  

  भावार्थ रामायण -संत एकनाथ 

 

महानुभावपंथीयांचे 'साती ग्रंथ'

1.शिशुपालवध   इ.स. 1195 भास्करभट्ट बोरीकर 

 5. ज्ञानबोध इ. स. 1253  - विश्वनाथ बाळपूरकर  

 2.एकादशग्रंथ  इ.स.1196 कवी भास्करभट्ट 

 6. सह्याद्रिवर्णन -इ.स. 1254 - खळोव्यास 

3. वस्त्रहरण इ.स.1200 दामोदर पंडित

7.  ऋद्धिपुरवर्णन-इ.स. 1285-नारोव्यास

4. रुक्मिणी स्वयंवर इ.स. 1210  नरेंद्र कवी

 

 

मराठीतील पाच प्रमुख संतकवी 

 1. ज्ञानेश्वर -भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी 

 2. नामदेव -नामदेव गाथा

 3. एकनाथ -चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, भारुडे व गौळणी ही लोकगीते

 4. तुकाराम - तुकाराम गाथा

  5. रामदास- दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके इत्यादी.

 

 

मराठीतील पंडित कवी

 1. मुक्तेश्वर -श्लोकबद्ध रामायण, मुक्तेश्वरी, महाभारत 

 2. वामन पंडित -निगमसार, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थ दीपिका 

 3. सामराज -रुक्मिणीहरण व मुद्गलाख्यान 

 4. नागेश -सीतास्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावलीवर्णन, शारदाविनोद, रसमांजिरी

 5. रघुनाथ पंडित- नल दमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष 

  6. श्रीधर -हरिविजय, श्रीरामविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत

 7. मोरोपंत - मोरोपंती महाभारत, मोरोपंती रामायणे, हरिवंश, कृष्णविजय, केकावली इत्यादी.

 

 

मराठी शाहीर (तंतकवी)

 परशराम

 अनंत फंदी 

  राम जोशी

 होनाजी 

 सगनभाऊ

 प्रभाकर

 

आधुनिक कवि- पंचक

 विनायक जनार्दन करंदीकर

 बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे )

 केशवसुत (कृष्णाजी केशव दामले ) 

 गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी ) 

 नारायण वामन टिळक

 

 

मराठीतील विशेष

 1.मराठीचे पाणिनी-दादोबा पाडुरंग तर्खडकर  

 11.‘माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक-महात्मा गांधी

 2.मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण-महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (गंगाधर शास्त्री फडके यांचे)

 12.'विशाखा' या काव्याचे लेखक-कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) 

 3.मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी-मोचनगड (गुंजीकर यांची)

 13.अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी-फकिरा

 4.मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी-यमुनापर्यटन - बाबा पद्मनजी

 14. 'ग्रामगीते'चे लेखक- संत तुकडोजी महाराज 

 5.मराठीतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी-'यात्रिक क्रमण' - हरीकिशनजी

 15. 'गुलामगिरी' या ग्रंथाचे लेखक-महात्मा फुले

 6.मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार-साळूबाई तांबेकर

 16. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक-पंडित महादेवशास्त्री जोशी

 7.विरामचिन्हाचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत यांनी सुरू केली - मेजर कॅन्डी

 17. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती - वि. स. खांडेकर (ययाती) 

 8. मराठीतील पहिले नियतकालिक 'दर्पण'चे संपादक- बाळशास्त्री जांभेकर

 18. श्यामची आई चित्रपटाचे निर्माते -आचार्य अत्रे

 9.या मराठी संताचे अभंग शिख धर्मग्रंथात आढळतात-संत नामदेव

 19. कोलकाता भाषा साहित्य पुरस्कारविजेती कादंबरी-पडघवली 

 10.'स्वावलंबी शिक्षण' हे या शिक्षणसंस्थेचे ध्येय आहे-रयत शिक्षण संस्था 

 20. प्रसिद्ध संत कवी सोपानदेव यांचे समाधीस्थळ -सोमेश्वर

 21. काव्यफुले या कवितासंग्रहाच्या लेखिका - सावित्रीबाई फुले

 

 

 संत व त्यांची मूळ गावे 

 श्री शंकराचार्य-कालडी (केरळ)

 संत एकनाथ-पैठण (महाराष्ट्र)

 संत मुक्ताबाई-आपेगाव (महाराष्ट्र)

 संत बसवेश्वर-बागेवाडी (विजापूर), कर्नाटक

 श्री संत नामदेव-नरसी बामणी, जि. हिंगोली (महाराष्ट्र)

 संत ज्ञानेश्वर-आपेगाव (महाराष्ट्र)

 संत रामदास स्वामी-जांब, ता. अंबड, जि. जालना

 संत तुकाराम -देहू (महाराष्ट्र)

 संत सावता महाराज-अरणभेंडी (पंढरपूर), महाराष्ट्र

  संत जनाबाई -गंगाखेड, जि. परभणी 

 संत तुलसीदास-राजापूर, जि. बांदा ( उत्तर प्रदेश) 

 संत नरहरी महाराज-पंढरपूर, (महाराष्ट्र)



संत / कवी-वचन / गीत

  • संत ज्ञानेश्वर -  पैल तो गे काऊ कोकता हे, शकुन गे माये सांगताहे 
  • संत तुकाराम  - पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराची मी ।
  • विठ्ठल वाघ  -  काळ्या मातीत मातीत तिफण चालते
  • संत तुकाराम  -  बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  • नारायण मुरलीधर गुप्ते  -  गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या? का गं गंगायमुनाहि मिळाल्या?
  • समर्थ रामदास  -  शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप
  • कुसुमाग्रज  -  सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
  • तुकडोजी महाराज   -  या भारतात बंधुभाव ---
  • श्री. कृ. कोल्हटकर  -  बहु असोत सुंदर संपन्न की महा

वर्ष व महोत्सव

  • रौप्य महोत्सव - 25 वर्षे
  • सुवर्ण महोत्सव-50 वर्षे
  • हीरक महोत्सव-60 वर्षे
  • अमृत महोत्सव-75 वर्षे
  • शतक महोत्सव-100 वर्षे

🟡स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याची महत्वाची माहिती

🔶महाराष्ट्रातील महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा