MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ -2 Marathi proverbs and their meanings



मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ

  एका हाताने टाळी वाजत नाही -दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.  

 एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी - बाहेर बडेजाव; पण घरी दारिद्र्य

 एक कोल्हा सतरा ठिकाणी - - एका व्यक्तीपासून अनेक व्याला ठिकाणी उपद्रव होणे.

  एका खांबावर द्वारका -एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.

 एका पिसाने मोर होणे (होत नाही)- थोड्याशा यशाने हुरळून जाणे..

 एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये -दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.

 एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी - दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणेः

  ऐकावे जनाचे करावे मनाचे -  लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.

 एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.

 दात आहेत तर चने नाहीत, चने आहेत तर दात नाहीत- एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे

  दृष्टीआड सृष्टी - आपल्यामागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.

 दोन मांडवांचा वऱ्हाडी, उपाशी - दोन गोष्टिवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही. 

  दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई -नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.

  दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला- नशिबाने मिळणे; परंतु घेता न येणे.

 दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी- नशिबात नसल्यास जवळ आलेली संधीसुद्धा दूर जाते.

 दैव देते आणि कर्म नेते - नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वत:च्या कृत्यामुळे नुकसान होते

 देखल्या देवा दंडवत - एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.

 देणे कुसळांचे घेणे मुसळाचे- पैसे कमी आणि काम जास्त.

 देव तारी त्याला कोण मारी ?- देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.

  दिल चंगा तो कटौथी मे गंगा - आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याच जवळ असते. -

 देश तसा वेश - परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.

 दे माय धरणी ठाय- पुरे पुरे होणे.

 दुधाने तोंड भाजले, की ताकपण फुंकून प्यावे लागते- एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.

 दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही - दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वत:च्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. 

  दुभत्या गाईच्या लाथा गोड- ज्याच्यापासून काही लाभ होतो. त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.

  दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते;परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.

  दिवस बुडाला मजूर उडाला - रोजाने वा मोलाने काम करणारा थोडेच स्वत:चं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.

  दिव्याखाली अंधार - मोठ्या माणसातदेखील दोष असतो.

 दिल्ली तो बहुत दूर है -झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.

 धर्म करता कर्म उभे राहते- एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.

 निंदकाचे घर असावे - शेजारी निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो; त्यामुळे आपले दोष कळतात.

 नावडतीचे मीठ आळणी - आपल्याविरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. 

 नाचता येईना अंगण वाकडे - आपल्याला एखादे काम करता येत नसेल, तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे.

 नाकापेक्षा मोती जड - मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे.

  नागीण पोसली आणि पोसणाराला डसली- वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच. 

  नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला -आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.

  नाक दाबले, की तोंड उघडते- एखाद्या माणसाचे वर्म त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.

 नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे -देवाच्या नावाने स्वार्थ जपणे..

  नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा - नाव मोठे लक्षण खोटे.

 धाऱ्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा- छोट्या गोष्टीची काळजी घेणे; परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे.

  नाकापेक्षा मोती जड - मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे

 नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे -एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे.

  नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले केलेला - उपदेश निष्फळ ठरणे, पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे.

  नव्याचे नऊ दिवस - कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.

  न कर्त्याचा वार शनिवार - ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते, तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.

 नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये-नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये, कारण त्यात काहीतरी दोष असतोच.

  नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने- दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात.

 घिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या - गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 'पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा' - पैसा कमी काम जास्त

  पुढे तिखट मागे पोचट - दिसायला फार मोठे; पण प्रत्यक्षात तसे नसणारे.

  पुढच्यास ठेच मागचा शहाणा-दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो. 

  पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) घालवून आली - फायदा होईल म्हणून जाणे; परंतु नुकसान होणे.

  पोर होईना व सवत साहीना आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही.

पोटी कस्तुरी, वासासाठी फिरे भिरीभिरी- असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  पळसाला पाने तीनच- सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

 पदरी पडले पवित्र झाले -कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली,  की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते.

 पळसाला पाने तीनच- सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

 पळसाला पाने तीनच- सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

  नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाहीतर नागवी बसेन - अतिशय हटवादीपणाचे वर्तन करणे.

 पायाची वहाण पायीच बरी- मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. 

 पी हळद नि हो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे

  पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली- पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे. 

  पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम -जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो. 

  पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा । जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे -अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही.

 पाची बोटे सारखी नसतात - सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात. 

 पाप आढ्यावर बोंबलते- पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही

 पाचामुखी परमेश्वर - बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 दाखविलं सोनं हसे मूल तान्हं- पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.

 दाम करी काम, बिवी करी सलाम- पैसे खर्च केले, की कोणतेही काम होते. 

 दात कोरून पोट भरत नाही-मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. 

 दहा गेले, पाच उरले- आयुष्य कमी उरणे.

 दस की लकडी एक का बोजा - प्रत्येकाने थोडा हातभार - लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण हाते.

 दगडापेक्षा वीट मऊ- मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते.

 थोरा घरचे श्वान सर्वही देती मान- मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.

 थेंबे थेंबे तळे साचे- दिसण्यात क्षुल्लक वाटणारा वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.

 तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे- खायला पुढे, कामाला मागे. 

 तोंड दाबून बुक्क्यांचा मार- एखाद्याला विनाकारणं शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.

 तेरड्याचा रंग तीन दिवस- कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.

 तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले - मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.

 तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे - आपले काम दुसऱ्याने करावे, आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.

 तुकारामबुवाची मेख- न सुटणारी गोष्ट. 

 तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही- चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.

 तीन दगडात त्रिभुवन आठवते -संसार केल्यावरच खरे मर्म कळते

 ताकापुरते रामायण - एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.

 तट्टाला टुमणी, तेजीला इशारत -जी गोष्ट मुर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.

 तरण्याचे कोळसे, म्हाताऱ्याला बाळसे- अगदी उलट गुणधर्म दिसणे. 

 तळे राखील तो पाणी चाखील - ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यातून काहीतरी फायदा करून घेणारच. 



फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावाच लागतो. -

 फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचणे- जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे.

 फुल ना फुलाची पाकळी - वास्तविक जितके द्यायला पाहिजे, तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे.

 फुटका डोळा काजळाने साजरा करावा आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो, तो झाकता येईल तितकाच झाकावा.

 बडा घर पोकळ वासा - दिसण्यास श्रीमंती; पण प्रत्यक्षात तिचा अभाव.

बळी तो कान पिळी बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवितो.


• बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना निरुपयोगी गोष्ट.


♦ बाप से बेटा सवाई - वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार, बाप तैसा बेटा बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे.


♦ बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यास बावळट; पण व्यवहारचतुर माणूस.


• काल्पनिक गोष्टीवरून बाजारात तुरी, भट भटणीला मारी भांडण करणे, m


◆ बारक्या फणसाला म्हैस राखण त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपविणे. ज्याच्यापासून धोका आहे


• घोर संकटाच्या काळी मिळालेली बुडत्याला काडीचा आधार थोडीशी मदतदेखील महत्त्वाची वाटते.


● बैल गेला अन् झोपा केला- एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.


• बोलेल तो करेल काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही.


● बोडकी आली व केसकर झाली - विधवा आली अन् लग्न लावून गेली.


भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी- एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो.


भरवशाच्या म्हशीला टोणगा ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे, नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. -


● भित्यापाठी ब्रह्मराक्षस - भित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असणे.


● भिंतीला कान असतात गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही.


भीड भिकेची बहीण उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येते.


• भीक नको; पण कुत्रं आवर एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये; परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती.


◆ भागीचे घोडे किवणाने मेले - भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ • सर्वच घेतात; काळजी मात्र कोणीच घेत नाही.


• मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.


- मनात मांडे पदरात धोंडे केवळ मोठमोठी मनोराज्ये करायची; परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती.


• मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टींचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे. .


एखादे वाईट कृत्य ● मनाची नाही, पण जनाची तरी असावी करताना मनाला काही वाटले नाही, तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा. W


मन जाणे पाप - आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच.


◆ मन राजा मन प्रजा - हुकूम करणारे आपले मनच, ते पाळणारेही आपले मनच असते.


● एकाला बोलणे माणकीस बोललं; झुणकीस लागलं अन् दुसऱ्याला लागणे.


→ क्षुल्लक गोष्टीचा गवगवा मामुजी मेला अन् गाव गोळा झाला करणे. 1


• मांजरीचे दात तिच्या पिलास लागत नाहीत बोलणे लेकराच्या हिताचेच असते. आईवडिलांचे


● ● मानेवर गळू आणि पायाला जळू रोग एकीकडे उपाय, भलतीकडे, मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम.


छोट्याशा मुंगीला मिळाला गहू, कुठे नेऊ अन् कुठे ठेवू ? गोष्टीनेही हुरळून जाणे.


● लहान लोकांना लहान संकटही डोंगराएवढे मुंगीला मुताचा पूर वाटते..


• मुलाचे पाय पाळण्यात दिसतात गुण-दोषांचे दर्शन होते. लहान वयातच व्यक्तीच्या


मूर्ख लोक भांडती, वकील घरे बांधती मुर्खाचे भांडण अन् तिसऱ्याचा लाभ. -


मेल्या म्हशीला मणभर दूध मेल्यावर गुणगान करणे.



● म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजाडायचे निसर्गनियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच.


wh ● म्हशींचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते.


यथा राजा तथा प्र - 'सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात.


● या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे - बनवाबनवी करणे.


ये रे माझ्या मागल्या ताक-कण्या चांगल्या - एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे.


ये रे कुत्र्या, खा माझा पाय- आपणहून संकट ओढवून घेणे. रंग जाणे रंगारी- ज्याची विद्या त्यालाच माहीत. •


● रात्र थोडी सोंगे फार - कामे भरपूर; पण वेळ थोडा असणे.


रडत राऊत (रडतराव) घोड्यावर स्वार जबाबदारी अंगावर पडणे. इच्छा नसताना


रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत - मुख्य गोष्टीचा अभाव.


300.


आनंद पब्लिकेशन, औरंगाबाद



•परिपूर्ण मराठी व्याकरण


• करणे - मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे.


राईचा पर्वत


मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ


• राजाचे घोडे आणि खासदार उडे दुसऱ्याची. वस्तू एकाची मिजास


• रोज मरे त्याला कोण रडे? तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. -


● लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस कार्यालाच खर्च अधिक. मुख्य कार्यापेक्षा गौण


● लष्कराच्या भाकऱ्या भाजणे बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे.


लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही धाकाशिवाय शिस्त नाही. -


● लग्नाला गेली आणि बारशाला आली अतिशय उशिराने पोहोचणे.


• लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो.


● लाज नाही मना कोणी काही म्हणा निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.


• लेकी बोले सुने लागे - एकाला उद्देशून; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.


● लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण लोकांना | उपदेश करायचा; पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.


4 ♦ - वळणाचे पाणी वळणावरच जाणे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावयाच्या त्या घडतच राहणार.


• वरातीमागून घोडे - योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. • वारा पाहून पाठ फिरवणे परिस्थिती पाहून वर्तन करणे.


• वाहत्या गंगेत हात धुणे किंवा तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे सर्व साधने अनुकूल असली, की होईल तो फायदा करून घेणे.


- • वासरांत लंगडी गाय शहाणी मूर्ख माणसांत अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो.


• वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच - वाईट व्यक्तीला चांगले म्हटले किंवा वाईट, तरी त्रास द्यायचा तो देणारच.


- ● विंचवाचे बिहऱ्हाड पाठीवर गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. • विशी विद्या तिशी धन योग्य वेळेत योग्य कामे केली, की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो.


• विचाराची तूट तेथे भाषणाला ऊत - मुर्खाच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते.


• विश्वासाने ठेवला घरी, चारी सुना गरवार करी - विश्वासघात करणे.


♦ व्याप तितका संताप कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असते.


• शहाण्याला शब्दाचा मार- शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते.


● शितावरून भाताची परीक्षा संपूर्ण वस्तूची परीक्षा होते. वस्तूच्या लहान भागावरून त्या


• • शेरास सव्वाशेर / चोरावर मोर एकाला दुसरा वरचढ भेटणे. शेजी देईल काय आणि मन धायेल काय? शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही.


• एकाची वस्तू घेऊन शेजीबाईची कढी, धाव धाव वाढी दुसऱ्यावर उपकार दाखविणे.


● शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी- चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात.


● सगळेच मुसळ केरात मुख्य व महत्त्वाच्या गोष्टींकडेच दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे. -


● सरड्याची धाव कुंपणापर्यंतच प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते.


• संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरवात - एखाद्या गोष्टीचा • आरंभ मुळापासून करणे


• संग तसा रंग संगतीप्रमाणे वर्तन असणे.


• सारा गांव मामाचा एक नाही कामाचा जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे; पण त्यांपैकी कोणाचाच उपयोग न


होणे.


साप साप म्हणून भुई धोपटणे संकट नसतांना त्याचा आभास निर्माण करणे.


● सात हात लाकूड, नऊ हात ढलपी - एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे.


● सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी एकदम अशक्य कोटीतील गोष्टी करणे.


सुरुवातीलाच माशी शिंकली आरंभालाच अपशकुन.


• सुंभ जळाला तरी पीळ जात नाही- वैभव गेले तरी ताठा जात नाही.


♦ स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही.


● हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते आजार, संकटे येतात ती लवकर मोठ्या प्रमाणावर येतात; पण कमी होताना हळूहळू कमी होतात.


खोटे अश्रू • हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा ढाळणे.


• हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्याचा दाणा मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे. -


301

-परिपूर्ण मराठी व्याकरण


हत्ती गेला; पण शेपूट राहिले कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला.


◆ हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, स्वत:ला झीज लागू न देणे.


हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते जेथे भले- भले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात. -


♦ हात ओला तर मित्र भला असेल तर लोक तुमचे गोडवे - तुमच्यापासून काही फायदा होणार गातात.


हात फिरे तिथे लक्ष्मी वसे नांदते. उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती


•> हातच्या काकणाला आरसा कशाला ? स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.


हाजीर तो वजीर- जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो.


जे आपल्या हातात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे आहे, ते सोडून, दुसरे मिळेल या आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे.


हिरा तो हिरा, गार ती गार झाल्यावाचून राहत नाहीत. - गुणी माणसाचे गुण प्रकट


हियापोटी गारगोटी चांगल्याच्या पोटी नाठाळ.


होळी जळाली आणि थंडी पळाली - होळीनंतर थंडी कमी होते.


'श्री' च्या मागोमाग 'ग' येतो.


संपत्तीबरोबर गर्व येतो.


2)


गळा नाही सरी, सुखे निद्रा करी. सुखाने झोप येते. जवळ संपत्ती नसेल तर


पावरी बोली


P लेकी बोले सुने लागे रूपड्या ताकली गुपज्या माकली कागला काल भुईला भार खायला काळ अन् भुईला भार.


करनू ती तीला डरनू ती कर नाही त्याला डर काय ?


खिसाम नाय आदलू नी अत्ती गुलवतलू - खिशात दमडी नाही अन् चालला हत्ती घ्यायला. .


वऱ्हाडी बोली


काखेत घेतलं टिचुकलं सारं गावत इचकलं - काखेत कळसा अन् गावाला वळसा


चुली सांगे मुलीले, दोन्ही पाय चुलीले - दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण


झाडी बोली


होता जोन्द्रा दिस्ते - मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. -


मा तसि लेक्/ मसेला येक् - एका माळेचे मणी संदर्भ : मराठी पाठ्यपुस्तक महामंडळ, पुणे टीप : एकाच म्हणीचे वेगवेगळे अर्थ असू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा