MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ-3



गळ्यातले तुटले ओटीत पडले- नुकसान होतं होता टळणे

गळ्यात पडले  झोंड हसून केले गोड- गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टसुद्धा गोड मानून घ्यावी लागते. 

ग ची बाधा होणे - गर्व चढणे.

 गरजेल तो पडेल काय -केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही.

गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.

 गर्वाचे घर खाली- गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.

 गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता - मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. 

 गांड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.

गाढवाला गुळाची चव काय ? - ज़्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.

 गावंढ्या गावात गाढवीण सवाशीण - जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते.

गाढवाच्या पाठीवर गोणी-एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही; तर तिचा फायदा घेता यायला हवा.

गाढवाने शेत खाल्ले, ना पाप, ना पुण्य - अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते. 

कोळसा उगाळावा तितका काळाच- वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.

कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी - चूक एकाची शिक्षा दुसऱ्यालाच.

कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी ? - महान गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे.

खर्चणाऱ्याचे खर्चत आणि कोठावळ्याचे पोट दुखते- खर्च करणाऱ्याचा खर्च होतो, तो त्याला मान्यही असतो, परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.

खाऊ जाणे तो पचवू जाणे -एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.

खाण तशी माती-आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे

खायला काळ भुईला भार - निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.

खाई त्याला खवखवे - जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.

खाऊन माजावे टाकून माजू नये - पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.

खोट्याच्या कपाळी गोटा - खोटेपणा, वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.

गरज सरो, वैद्य मरो - एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.

गाव करी ते राव ना करी - श्रीमंत व्यक्ती स्वत:च्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.

गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ - मुर्खाच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो.

गाय व्याली, शिंगी झाली- अघटित घटना घडणे.

" गाव जळे नि हनुमान बेंबी चोळे - दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे.

गोगलगाय न् पोटात पाय - बाहेरून गरीब दिसणारी; पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती.

घरचे झाले थोडे व्यायाने धाडले घोडे - अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. 

घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.

 घरोघरी मातीच्याच चुली - एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

घर ना दार देवळी बिऱ्हाड - शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. 

घडाई परीस मढाई जास्त - मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.

घेता दिवाळी, देता शिमगा- घ्यायला आनंद वाटतों,द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.

घोडे कमावते आणि गाढव खाते -एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा. 

चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ - मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे -प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. 

चारजणांची आई बाजेवर जीव जाई - जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही..

चिंती परा येई घरा - दुसऱ्याचे वाईट चिंतीत राहिले, की ते आपल्यावरच उलटते.

चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला. . स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.

चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागूबाई - घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा; पण बाहेर मात्र घाबरायचे.

चोर सोडून संन्याशालाच फाशी -खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.

चोराच्या उलट्या बोंबा - स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.

चोरावर मोर - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.

चोरांच्या हातची लंगोटी - ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे,

चोराची पावली चोराला ठाऊक - वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.

चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय, अशी सतत भीती असते.

चालत्या गाडीला खीळ - व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.

 जशी देणावळ तशी धुणावळ - मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.

जलात राहून माशांशी वैर करू नये - ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.

 जळतं घर भाड्याने कोण घेणार ?- नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार?

जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे-दुसऱ्याच्या स्थितीत आपण  जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान होते. 

जित्या हुळहुळे आणि मेल्या कानवले - जितेंपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोडकौतुक करायचे.

जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी -अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे. 

जे न देखे रवि ते देखे कवी- जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो.

जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? जेथे गोड बोलून काम होते तेथे जालीम उपायाची गरज नसते. 

ज्या गावाच्या बोरी, त्या गावाच्या बाभळी - एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.

ज्याच्या हाती ससा, तो पारधी- ज्याच्या हाती वस्तू असते, ` त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.

 ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे - एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.

 ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.

झाकली मूठ सव्वा लाखाची -व्यंग नेहमी झाकून ठेवावे.

 टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही- कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा येत नाही.

डोळ्यात केर आणि कानात फुंकर -रोग एका जागी व दुसऱ्या जागी उपचार 

ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही, पण गुण लागला-वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीनं चांगला माणूसही बिघडतो. 

 ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधु तैसा -वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा