MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

ध्वन्यार्थ-मराठी व्याकरण

 ध्वन्यार्थ


अंग - शरीर, भाग, बाजू, अवयव

 चरण-   पाय, कवितेची ओळ

अक्षर- पूर्ण उच्चाराचा वर्ण, शाश्वत 

भाव -किंमत, भक्ती, दर, आशय

अभंग- मराठी काव्यरचनेचा एक प्रकार, न भंगलेले

चिरंजीव-मुलगा, कायम टिकणारा

अंबर -आकाश, वस्त्र 

पात्र- योग्य, भांडे, नदीचे पात्र, नाटकातील भूमिका

अनंत -अमर्याद, विष्णू

जलद-वेगाने, मेघ

अर्थ -पैसा, आशय

पाव -चौथा हिस्सा, पाय, खाण्याचा पदार्थ

अंक-आकडा, मासिकाचा अंक, मांडी

जीवन -आयुष्य, पाणी

ओढा- पाण्याचा प्रवाह, आकर्षण

पक्ष -  पंधरवडा, पंख, बाजू

उत्तर- प्रश्नाचे उत्तर, उत्तर दिशा, नंतरचा, उत्तरपद

तट- किनारा, किल्ल्याची भिंत, कडा

कळ -गुप्त किल्ली, वेदना, भांडणाचे

पण-प्रतिज्ञा, सुद्धा, परंतु 

हार-कारण गळ्यात घालण्याचा हार, पराभव 

दल- सैन्य, पाकळी

कर्ण-कान, कुंतीपुत्र

पय -दूध, पाणी

सुमन- फूल, चांगले मन

द्विज़-पक्षी, ब्राह्मण, दात

काम-कृत्य, इच्छा, मदन देव

नाद -आवाज 

शुद्ध -पवित्र, निर्मळ, स्पष्ट जाणीव

नाव - व्यक्ती/ वस्तूचे नाव, होडी.कीर्ती

काळ- वेळ, मृत्यू

घड -मानेखालचा शरीराचा भाग,व्यवस्थितपणा, नीट 

विषय-शिकण्याचा एखादा विषय, पैसा, प्रदेश 

दंड - बाहू, शिक्षा

कोट- अंगात घालण्याचे एक कापड़, संख्या, किल्ला

पत्र - चिठ्ठी लेखी मजकूर

वाढ-वाढ होणे, जेवायला वाढणे 

तीर-बाण, काठ 

कोळी-   मासे पकडणारा, एक कीटक

पर-पीस, परका, परंतु

वात - दिव्याची वात, वारा, एक विकार 

डाव   -खेळाचा डाव, कारस्थान

खडा-लहानसा दगड, उभा 

पट-शाळेतील मुलांची एकूण संख्या, सोंगट्याचे साधन, वस्त्र, नियमांचा तक्ता

वाणी- बोलणे, व्यापारी

जागा-ठिकाण, जागृत

खोड-  झाडाचे खोड, वाईट सवय, व्यंग

पाट -बसायचा पाट, पाण्याचा पाट 

 वर - श्रेष्ठ, पती, आशीर्वाद, दिशा

चाल - गती, हल्ला, पद्धती 

गंध-कपाळाला लावण्याचा गंध, सुवास

पार -मर्यादा, वडाचा पार, पलीकडे

माळ- फुलांची माळ, ओसाड जागा

चपला -पायात घालण्याची वहाण, वीज 

गदा -एक आयुध, संकट

पूर - पाण्याचा पूर, नगर 

माया -  प्रेम, धन

घाट -डोंगरातील रस्ता, आकार, नदीच्या पायऱ्या

गोम- अनेक पायांचा एक किडा, खोड, खुबी 

भेट- भेटी-गाठीतील भेट, नजराणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा