MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

विष्णूशास्त्री पंडीत यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८२७ - १८७६)-Vishnushastri Pandit mpsc


 विष्णूशास्त्री पंडित (इ. स. १८२७-७६)

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात अनेक धार्मिक व सामाजिक चळवळी सुरू झाल्या. त्या व्यापक व बहुउद्देशीय अशा होत्या. त्या काळातील अर्धशिक्षित लोक पाश्चात्यांचे अंध अनुकरण करीत होते. मात्र त्यांचे चांगले गुण स्वीकारत नव्हते. त्यामुळे समाजात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत होते. अशा वेळी समाजसुधारकांनी लोकांच्या स्तुतिनिंदेची पर्वा न करता सर्वांगीण सुधारणेचे विचार मांडले. त्या काळात प्रामुख्याने शिक्षण, स्त्रीशिक्षण, प्रौढ विवाह, पुनर्विवाह यांसारख्या असंख्य प्रश्नांचा त्यांनी ऊहापोह केला. त्यांनी बुद्धिवादी दृष्टिकोण स्वीकारला. त्याचबरोबर कार्याची निश्चित दिशा देणारे विचार मांडले. अशा सुधारकांच्या मालिकेत विष्णुशास्त्री पंडितांची वर्णी लागते. समाज सुधारणेसाठी त्यांनी कायावाचामने अविश्रांत श्रम घेतले. केवळ शाब्दिक काथ्याकूट करून लोकांचे मतपरिवर्तन होणार नाही याची पूर्ण जाण त्यांना होती. स्त्रीजातीच्या उन्नतीसाठी सर्वशक्तीनीशी त्यांनी प्रयत्न केले. लोकनिंदेचे आघात सहन करून आपले कार्य चालूच ठेवले.

 जीवन वृत्तांत 

 विष्णुशास्त्री पंडितांचे गाव सातारा जिल्ह्यातील बावधन हे होय.त्यांच्या वडिलांचे नाव परशुरामशास्त्री. ते पुढे सातारकरांच्या आश्रयाला आले.१८२७ मध्ये विष्णुशास्त्री यांचा जन्म झाला. वेदशास्त्र संपन्न राघवेद्राचार्य गजेंद्रगडकर  यांच्या जवळ ते त्यांनी न्याय, व्याकरण आदि प्राचीन शास्त्रांचा अभ्यास केला.  पुढे १८४५  साली ते इंग्रजी शिक्षण घेण्यास पुणे येथे गेले, परंतु त्यांच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शाळा सोडल्यानंतरही त्यांनी आपला इंग्रजीचा व्यासंग चालूच ठेवला. त्या भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा भार त्यांच्यावर पडल्यामुळे सरकारी खात्यात ट्रान्सलेशन ओक्झिबिशनर म्हणून नोकरी पत्करली. भाषांतरांच्या कामाबरोबरच त्यांनी अध्यापनाचे कामही समाधानी होते असे नव्हे. ते समाज सुधारणेची तळमळ असणारे सेवक होते.  समाजातील घडामोडीचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले होते. त्यामुळे त्यांना सनातन्यांच्या रूढीप्रियतेंचा व अविचारीपणाचा मनस्वी  असे. १८६४  त्याच साली त्यांनी नोकरीतून निवृत्ती  चालविले. १८६४ पासून त्यांनी विधव विवाहाचे कार्य हाती घेतले व नेटाने स्वीकारली.स्त्रियांवरील अन्याय अत्याचारास वाचा फोडण्यास त्यांनी सुरुवात केली. लोकसेवेचे व जागृतीचे प्रभावी साधन म्हणून वृत्तपत्र व्यवसायात त्यांनी लक्ष घातले. त्याद्वारे त्यांनी समाज सुधारणेच्या बाबत आपले विचार मांडून समाज जागृतीचे कार्य करीत असतानाच त्यांचा १८७६ मध्ये अंत झाला. 

 वृत्तपत्र वाङ्मयीन क्षेत्रातील कार्य 

 लोकजागृतीचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी " 'इंदूप्रकाश' या वृत्तपत्रात १८६४ साली उपसंपादक म्हणून काम पाहण्यास प्रारंभ केला. हे वृत्तपत्र दोन वर्षांपूर्वीच सुरू झाले होते. बाळशास्त्रींनी अखेरपर्यंत या वृत्तपत्रातून आपले समाजसुधारणे विषयीचे विचार मांडण्याचे चालू ठेवले होते. स्त्रीजातीचा उद्धार, त्यांच्यावरील अन्याय, बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरठकुमारी विवाह इत्यादी प्रश्नांची सांगोपांग चर्चा केली आहे. समाजातील या अन्याय झालेल्या घटकांची दु:खे मांडून त्यांनी समाजाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्यांनी पुढील महत्त्वाचे ग्रंथलेखन केले. 'नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर', 'हिंदुस्थानचा इतिहास भाग - ३', 'ब्राह्मणकन्या विवाह,' ‘इंग्रजी मराठी कोश,' 'विधवा विवाह, 'संस्कृत आणि महाराष्ट्र धातू कोश, ' 'शूद्रधर्म', ‘स्मृतिशास्त्र' इत्यादी पुस्तके लिहिली. त्या लिखाणातून त्यांनी प्रौढविवाह, विधवाविवाह यांसारख्या समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आपले निर्भिड विचार मांडले आहेत. याशिवाय देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या दृष्टीने कीर्तन करण्याचाही उपक्रम हाती घेतला होता. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे सामान्य जनांचा बुद्धिभेद करण्यापेक्षा धर्मवचनांच्या आधारानेच न्याय सुधारणांचे समर्थन केल्याचे दिसून येते. विष्णुशास्त्री पंडितांनी समाज सुधारणेच्या अनुषंगाने अनेक व्याख्याने दिली. त्यातील काही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी आपल्या लेखनात सामाजिक सुधारणांच्या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे. त्यांचे सगळे विवेचन जुन्या धर्मग्रंथावर आधारलेले आहे. प्राचीन धर्मग्रंथांचे चिकित्सक दृष्टीने अध्ययन करून त्यांनी आपली मते बनविली होती. त्यांची भाषा खडबडीत परंतु सरळ आणि सोपी होती. त्यांच्या लिखाणात आत्मविश्वास, शोधकता, व्यासंग व सुधारणेची तळमळ दिसून येते.

 सुधारणाविषयक विचार व कार्य 

विष्णुशास्त्री पंडितांनी महाराष्ट्रातील स्त्रियांच्या सुधारणेचाच प्रश्न हाती घेतला असला तरी समाजाच्या इतर अंगाची त्यांनी उपेक्षा केली नव्हती. आमच्यातील दास्यवृत्तीबद्दल त्यांना कमालीची चीड होती. समाजाचे दैन्य व दुरावस्था पाहून त्यांना फार दुःख होत असे. म्हणूनच बदलत्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून देशकल्याण कसे करावे याचे विवेचन ते आपल्या कीर्तनात करीत असत. ज्ञानाची श्रेष्ठता, व्यापाराचे महत्त्व, संघटित शक्ती, मद्यपानाचे वाईट परिणाम यांबाबत त्यांनी आपले विचार मांडले आहेत.

स्त्रियांच्या प्रश्नांचा ऊहापोह करताना त्यांनी स्त्रियांच्या समाजातील स्थानाची प्रथम चर्चा केली आहे. प्राचीन काळी स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. हे त्यांनी शास्त्राच्या आधारे दाखवून दिले आहे. स्त्रियांना ज्ञानाचा, विवाहाचा, धार्मिक विधीचा अधिकार होता हे प्रथम स्पष्ट केलेले आहे. कालप्रवाहात समाजातील लोकांनी त्यांना दुय्यम स्थान दिले. स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचा विचार करताना ते प्रथम पुनर्विवाहाच्या प्रश्नाकडे वळले आहेत. सामाजिक सुधारणेची चळवळ म्हणजे 'सुळावरची पोळी' आहे याची विष्णुशास्त्री पंडिताना पूर्ण जाणीव होती. लोकंविरोधाला न जुमानता त्यांनी लेख, व्याख्याने वादविवाद इत्यादी साधनांच्याद्वारे विधवा विवाहाचा प्रचार केला. आपल्या प्रयत्नांना संघटित स्वरूप मिळावे म्हणून त्यांनी काही लोकांच्या मदतीने पुनर्विवाहोतेजक मंडळची स्थापना १८६५ मध्ये केली. या सभेद्वारे प्रचाराचे कार्य चालू ठेवले. तिच्या विद्यमाने पुनर्विवाहाच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. बालविवाहामुळे होणारे बाहर परिणाम दिले. ते म्हणतात, "लहानपणी बापानी आपली मुले शहाणी केली तर कित्येक चांगली नितील आणि लग्न हे केंव्हा तरी त्यांचे स्वसामर्थ्याने घडेल, परंतु मुलास, रोजगार धंदा नाही, शहाणपणा नाही व पुढे कसा निघतो त्याचा अंकुर दिसत नाही तो त्याच्या गळ्यात मुलगी बांधून जोखिमात घालावा व त्याची विद्या, आयुष्य सर्व बुडवावे यात काय लाभ होतो. " सनातन्यांनी त्यांना फार त्रास दिला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाला विरोध म्हणून सनातन्यांनी हिंदू धर्मव्यवस्थापक सभा' स्थापन केली. लोकहितवादी, विष्णुशास्त्री पंडित इत्यादींनी एक पुनर्विवाह घडवून आणला. तो फारच गाजला. समाजातील सनातन्यांनी पुनर्विवाहाच्या लग्नपत्रिकेवर सह्या करणारांना जाब विचारला. लोकहितवादींनी त्यातून अंग काढून घेतले. मात्र विष्णुशास्त्री यांनी प्रायश्चित घेण्यास नकार दिला. त्यांच्यावर बहिष्कार टाकला. परंतु ते आपल्या विचारापासून दूर गेले नाहीत.

 विष्णुशास्त्री पंडित बोलघेवडे सुधारक नव्हते. ते कर्ते सुधारक होते. आपल्या तत्त्वांचे ते पालन करणारे होते. काही महाराष्ट्रातील सुधारकांनी सबबी सांगून आणीबाणीच्या वेळी पळ काढला होता. याची अनेक उदाहरणे देता येतील. मात्र विष्णुशास्त्री त्यातील नव्हते. १८७४ मध्ये त्यांच्या कसोटीचा क्षण आला. त्यांची पहिली पत्नी वारली. त्यांनी कुसाबाई या विधवेशी न्याय कचेरीत करार पत्राद्वारे विवाह केला. समाजात रूढ असलेल्या चार आश्रमांपैकी ब्रह्मचर्याश्रम व गृहस्थाश्रम हे दोनच उपयुक्त आहेत असे सांगितले. नुसते पाठांतरी ज्ञान उपयुक्त नसते. ज्या ज्ञानातून अर्थप्राप्ती होते तेच खरे ज्ञान असे त्यांचे मत होते. परधर्मीय राजवटीत धर्मशिक्षणाची हयगय होते. म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 'स्त्रियांचे अधिकार' या व्याख्यानात स्त्री जीवनाच्या अनेक प्रश्नांची त्यांनी शास्त्रशुद्ध चर्चा | केली आहे. सामान्य जनांचा बुद्धिभेद करण्यापेक्षा धर्मवचनांच्या आधारानेच न्याय्य सुधारणांचे | समर्थन केल्यास ते अधिक परिणामकारक होते असे त्याचे मत होते. 

 योग्यता 

 उज्ज्वल चारित्र्य, अलौकिक कार्य निष्ठा, असामान्य नीतिधैर्य, लोकोत्तर त्याग इ. गुण विष्णुशास्त्री पंडितांच्या ठिकाणी होते. हरएक प्रकारची सुधारणा करण्यासाठी कायावाचामने अविश्रांत श्रम करणारा तो कलियुगातील ऋषी होता. आपल्यातील अनिष्ट चालीचे स्वरूप जाणून व्यापक दृष्टीने समाजाचे कल्याण होण्याच्या दृष्टीनेच त्यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रात कार्य केले. त्यांना ज्या सुधारणा इष्ट वाटल्या त्या प्रांजल दृष्टीने आणि निर्भीडपणे लोकांसमोर मांडल्या. इंदूप्रकाश वृत्तपत्राचे संपादकत्व करून त्यांनी मराठी भाषेची व महाराष्ट्रीय जनतेची बहुमोल सेवा केली.

महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांची कार्ये व माहिती

☯️ आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जगन्नाथ शंकर शेठ (नाना)

☯️ मराठी वृत्तपत्राचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

☯️ मराठी भाषेचे पाणिनी- दादोबा पांडुरंग तर्खडकर 

☯️ लोकहितवादी- गोपाळ हरी देशमुख 

☯️ महाराष्ट्राचे धन्वंतरी - डॉ. भाऊ दाजी लाड 

☯️ विष्णुशास्त्री पंडित 

☯️महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग - महात्मा ज्योतिबा फुले

☯️भारतीय राज्यघटनेचे जनक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा